बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेकनुर शाखेतील मयताच्या खात्यावरील अनुदान रक्कम परस्पर उचलली.

मी खूप इमानदार म्हणणारा #वाघमारे निघाला दरोडेखोर. #जिल्हा #मध्यवर्ती #बँकेच्या #नेकनुर #शाखेतील मयताच्या खात्यावरील अनुदान रक्कम परस्पर उचलली.मयत शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे गायब; #जिल्हा #मध्यवर्ती #बँकेच्या #नेकनुर #शाखेतील प्रकार; कारवाईची मागणी:- डॉ.गणेश ढवळे–बीड:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेकनुर शाखेत अधिकारी दलालांचे रॅकेट कार्यरत असुन मयत शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैसे व्यावस्थापक, रोखपाल यांनी संगनमताने काढत एकुण ७३ हजार ३९२ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असुन संबंधित प्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक , जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी दि.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.यापुर्वीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेतुन गोलंग्री आणि कानडी घाट येथील मयत शेतकऱ्यांच्या खात्यावरील रकमा परस्पर उचलण्यात आल्याचे प्रकार घडले असुन त्यासंबधात चौसाळा शाखेतील ३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.सविस्तर माहितीस्तव—भगवान गणपती सिरसट रा.वडगाव ( कळसंबर) ता.जि.बीड यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड नेकनुर शाखेत बचतखाते असुन त्याचा क्रमांक ००२८११००२१०१०३८ आहे.भगवान गणपती सिरसट यांचा दि.२२.०३.२०१७ रोजी मृत्यू झाला.मात्र त्यांच्या खात्यावरील दि.२५.०७.२०१८ रोजी १२,२६० रुपये दिनांक ०९.०५.२०१९ रोजी १३,१३२ रूपये आणि दि.२५.०८.२०२२ रोजी ४८,००० रूपये असा एकुण ७३,३९२ रूपये शाखा व्यवस्थापक, रोखपाल यांनी संगनमताने परस्पर खात्यातुन काढून घेतले असुन संबंधित प्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.वसुलीची कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत:- अर्जुन भगवान सिरसट (मयत शेतक-याचा मुलगा)—-आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यावरील नेकनुर शाखेतील शिल्लक रकमेची विचारणा केली असता व्यावस्थापक, रोखपाल यांनी कोर्टाचे वारस प्रमाणपत्र आणायला सांगितले.वारस प्रमाणपत्र दिल्यानंतर सुद्धा वडीलांच्या खात्याचा उतारा मागितला असता टोलवाटोलवी करता दिला नाही.आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा बीड येथुन खाते उतारा काढला असता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यावरील एकुण ७३,३९२ रुपये रक्कम परस्पर काढल्याचे आढळुन आले.त्यामुळे संबंधित प्रकरणात व्यावस्थापक, रोखपाल यांनी संगनमताने अपहार केल्याचे निदर्शनास येत असुन चौकशी करून रक्कम वसुलीची आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड व सपोनि नेकनुर पोलिस स्टेशन यांना केली आहे.यापुर्वीही मयताच्या खात्यावरील रक्कम गायब प्रकरणात चौसाळा शाखेतील ३ कर्मचारी निलंबित —जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड शाखेच्या कार्यालयात अधिकारी आणि दलालांचे रॅकेट कार्यरत असून यापुर्वीही डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केलेल्या तक्रारीवरून चौसाळा शाखेतील गोलंग्री येथील मयत शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर गायब प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी नंतर चौसाळा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी प्रशांत बीडकर, रोखपाल, प्रल्हाद कुडके आणि मुख्य तपासणीस ज्ञानोबा जोगदंड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.कानडी घाट येथील मयत शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम गायब प्रकरणी कारवाईस टाळाटाळ—जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड चौसाळा शाखेतील कानडीघाट येथील मयत शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम गायब प्रकरणी कारवाईसाठी जानेवारी पासून निवेदन आणि आंदोलनानंतर सुद्धा अद्याप केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा सुरू असुन कानडी घाट ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच जलसमाधी आंदोलन करून सुद्धा अद्याप कारवाई करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.त्यामुळे एकंदरीतच वरपासून खालपर्यंत अधिकारी दलालांचे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून येते.डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकरमो.नं.८१८०९२७५७२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page