अटल सौर कृषी पंप योजना मधील सौर पंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड यांचा आदेश.

मौजे आनंदगाव तालुका शिरूर येथील शेतकरी तक्रारदार नानाभाऊ धर्मा काळे यांनी गट क्र २०९ मध्ये ऑफलाईन पद्धतीने शासनाकडे अर्ज करून सोडत पद्धतीने ५ एच पी चा पंप व सोलार पॅनल सहित किंमत रक्कम रुपये २,४०,४९०/-(दोन लाख चाळीस हजार चारशे नव्वद ) अशी आहे त्या मध्ये तक्रारदार शेतकरी यांनी स्वतच्या हिश्याची १२०२५/-(बारा हजार पंचीवीस ) दिनांक.२१/०२/२०१९ रोजी भरले आणि रवी चंद्रन सगुणा पंप्स अॅण्ड मोटर्स कोईम्बतूर यांच्या कडून खरेदी केला होता. त्याला संमती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालय लातूर यांनी दिली होती. तसेच सदरील संच याची ५ वर्ष देखभाल करणे हि कंपनीची जबादारी होती पण सदरील पंपात सन २०२१ मध्ये बिघाड झाला कंपनीला तक्रार करूनही काहीही फरक पडला नाही. सदरील पंप दुरुस्त करून देण्याची तजवीज सुद्धा दाखवली नाही मग तक्रारदार याने कंपनीला कायदेशीर नोटीस देऊनही त्या नोटीसला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामूळे तक्रारदार याने वकिलां मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड यांच्या कडे तक्रार क्र ८०/२०२३ दाखल केली. झालेल्या सुनावणीत तक्रारदार यांची बाजू ऐकून घेऊन सामनेवाले महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालय लातूर व रवी चंद्रन सगुणा पंप्स अॅण्ड मोटर्स कोईम्बतूर यांना मा.आयोग यांनी नोटिस देऊनही ते हजर झाले नाहित. त्यामुळे यांच्या वतीने एकतर्फा निकाल दिला. सदर निकालात मा.आयोग यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालय लातूर व रवी चंद्रन सगुणा पंप्स अॅण्ड मोटर्स कोईम्बतूर यांना आदेशीत केले की तक्रारदार यास दिलेला सोलर पंप संच हा आदेश तारखे पासून ४५ दिवसात दुरुस्त करून देण्यात यावा, अथवा नवीन सोलार पंप देण्यात यावा अथवा, त्या पंपाची किंमत रक्कम रुपये २,४०,४९०/- (दोन लाख चाळीस हजार चारशे नव्वद) हि देण्यात यावी. तसेच मुदतीत रक्कम न दिल्यास दसादशे १२ टक्के व्याज द्यावे.
तसेच तक्रारदार यास नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. २०,०००/- हजार रुपये,तसेच खर्चा पोटी २०,०००/- हजार रुपये ४५ दिवसात देण्यात यावेत.अन्यथा रक्कम जमा करे पर्यंत ८ टक्के व्याज देण्यात यावे असे आदेश दिले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड चे अध्यक्ष श्री हरीश गो.अडके, सदस्या श्रीमती सतिका ग.शिरदे यांनी दिनांक .१६/०२/२०२४ रोजी महावितरण कंपनीला दिले आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड.एन.के.देशमुख. यांनी बाजू माडली व त्यांना ॲड.एस.आर.कुंभार,ॲड.व्ही.सी.मिसाळ, ॲड.एन.के.सिरसट यांनी सहकार्य केले आहे.
ग्राहक म्हणून प्रत्येकाने जागे होणे होणे ही काळाची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page