देवदर्शन करून गावी जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; अपघातात दोन डॉक्टरचा मृत्यू, तीन जखमी

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी येथे भिषण अपघात झाला या अपघातात डॉ. मृणाली भास्कर शिंदे व डॉक्टर असलेलाच मृणालीचा चुलत भाऊ जागीच ठार झाले तर डॉ. मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे दोघे नवविवाहित दाम्पत्य गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. जेजुरी वरून देवदर्शन करून पालम जि. परभणी येथे परत जात असताना मुळुकवाडी येथील पुलावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक झाला की गाडीचे टायर सुद्धा निखळून पडले. अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र यामध्ये दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यु झाला तर अन्य एक डॉक्टर व त्यांची पत्नी मृत्यूशी झुंज देत आहेत. तर डॉ. मृणाली ह्यांची एक वर्षाची मुलगी सुखरूप असल्याचे समजते. दरम्यान, पालम येथील ममता कॉलेज मधून नुकतेच ज्यु. प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले एम.पी. चव्हाण ह्यांच्या मंथन नावाच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते म्हणून सर्व भावंडं आणि इतर नातेवाईक देवदर्शनाला गेले होते. मात्र देवदर्शन करून परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने चव्हाण, शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घ्यावयाची काळजी
१. वाहन चालवण्यास आरंभ करण्यापूर्वी सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने दुचाकी चालवण्याची वेगमर्यादा (स्पीड लिमिट) ४० किलोमीटर, तर चारचाकी चालवण्याची वेगमर्यादा ६० किलोमीटर अशी असते. शहरातील रहदारीचे रस्ते, महामार्ग (हायवे), पूल आदी ठिकाणी वाहनाची वेगमर्यादा किती असावी ? याचे फलक तेथे लावलेले असतात. त्या वेगमर्यादेचे, तसेच अन्य नियमांचे पालन करून वाहन चालवावे.
२. दुचाकी गाडी चालवतांना शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा), तर चारचाकी वाहन चालवतांना ‘सीटबेल्ट’चा वापर करावा.
३. वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलू नये, तसेच भ्रमणभाष हाताळू नये.
