एलआयसी’ पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे गजाआड, मुंबई-पुणे रस्त्यावरील काॅलसेंटरवर छापा

आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींकडून पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाइल संच, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांची खाते पुस्तिका, धनादेश पुस्तिका जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी शंकर कारकून पोखरकर (वय ४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबुब सिद्दीकी (वय ४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (वय ४८, वाघोली) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पोखरकर मुख्य सूत्रधार आहे. एलआयसी एजंट असल्याची बतावणी करून आरोपीने २०२१ मध्ये शिवाजीनगर भागातील एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी वास्तव्याची ठिकाणे बदलत होते. तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील पोलीस कर्मचारी आदेश चलवादी, तेजस चोपडे यांनी बनावट कॉल सेंटरचा शोध घेतला. त्यानंतर वाकडेवाडी येथे फ्यूचर ग्लोबल सर्व्हिस नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला.पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस कर्मचारी नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांनी ही कामगिरी केली.एलआयसी ग्राहकांची माहितीअटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करत होता. त्यातून त्याने एलआयसीचा ग्राहकांचा माहिती मिळविली. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करुन आरोपींनी नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

I am extremely inspired together with your writing abilities as well as with the layout on your weblog. Is that this a paid topic or did you customize it your self? Either way keep up the nice high quality writing, it is uncommon to look a nice blog like this one these days!