ओटोपी दिला कि फसवणूक झालीच समजा.

ओटोपी दिला कि फसवणूक झालीच समजा.

इंटरनेटचा वापर आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र ऑनलाईन व्यवहार करताना साध्या सोप्या गोष्टीचे भान ठेवले नाही तर सायबर भामटे आपली फसवणूक करू शकतात. अनेक शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.  अशी बातमी आपण रोजच ऐकत आहेत.

गुगलवर माहिती सर्च करणे एका आर्मी ऑफिसर / बँक ऑफिसरला चांगलेच महागात पडले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर एक अँप पाठविला आणि तो डाउनलोड करण्यास सांगितले. तो डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एका क्षणात लाखो  रुपये ऑनलाइन काढून घेण्यात आले असे रोजच आहे आपल्या साठी काही नवीन नाही. अशा प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला जातो कधी पोलिस मदत करतात कधी करत देखील नाहीत.

अशी टाळावी फसवणूक

इंटरनेटशी जोडलेली कोणतीही यंत्रणा वापरताना आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी थोडी खबरदारी घेणे गरजेचे आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने बँकेचा, कुठल्याही खात्याचा, कंपनीचा ऑफिसर असल्याचे सांगितले, तरीही ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) देऊ नये. यूपीआय पिन, एटीएम-डेबिट-क्रेडिट कार्ड यांचा पिन, तसेच सीव्हीव्ही (मागील बाजूस असलेला तीन आकडी कोड), बँक खाते क्रमांक कोणालाही देऊ नये. यूपीआयद्वारे पेमेंट करताना नाव ‘व्हेरिफाय’ आहे का, हे तपासून बघावे. यूपीआय पिन, क्यूआर कोड स्कॅन करणे हे पैसे देताना करावे लागते. आपल्याला पैसे मिळण्यासाठी कधीच करावे लागत नाही. जुन्या वस्तू एखाद्या साइटवरून ऑनलाइन विकताना समोरचा फसवा माणूस ‘पैसे पाठवता येत नाहीत’ वगैरे सांगून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगेल. मात्र, हा प्रकार पैसे लुबाडण्यासाठी असतो, हे ध्यानात ठेवले पाहिजे. सायबर चोरटे फोन करून, बोलण्यात गुंतवून ओटीपी किंवा पिन मागणे, क्यूआर कोड स्कॅन करणे याची घाई करतात. त्या वेळी थेट फोन बंद करा आणि जाणकारांकडून माहिती घ्या.

आधी व्हॉट्सअँपवर व्हिडिओ कॉल नंतर लुबाडणूक

आपल्या व्हाट्सअप वर आधी अनोळखी तरुणीचा हाय हॅलो असा मॅसेज येतो, नंतर लगेचच व्हिडिओ कॉलवर मौज करायची का? असे विचारते. व्हिडिओ सेक्सची ऑफर दिली जाते, तुम्ही जर अशा कॉलचे बळी ठरलात आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास ओढवून घेणार आहात. अश्या पद्धतीने मोबाईलवर चॅटिंग करून आर्थिक लुबाडणूक केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. ‘ती’ व्हिडीओ कॉलवर आली आणि खिसा खाली करून गेली, असा अनुभव व्यक्तीला आला आहे. त्यामुळे अशा व्हिडिओ कॉल पासून सावधान रहावे असे आवाहन आहे.

सोशल मीडियावर फसवणूक

सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार नवीन नसले तरी अनेक जण त्याला बळी पडत असतात फसवणूक करणारे भामटे नवनवीन शक्कल लढवत सावज शोधत असतात. झटपट पैसा कमविण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या अशा टोळ्या टोळ्या सक्रीय झाल्या असून महाराष्ट्रात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे. पोलिसांकडे सायबर गुन्ह्यांच्या शेकडो तक्रारी दाखल झालेल्या आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये सहसा तरुण मुले व वृद्धांना टार्गेट केलं जातं. आधी व्हिडिओ कॉल करून संबंधिताला आपल्या जाळ्यात ओढले जाते त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून नंतर ब्लॅकमेलिंग करीत खंडणीची मागणी करण्यात येते.

परराज्यातून येतात हे कॉल

या टोळीत काही तोतया पोलिसांचा समावेश आहे त्यांचे नंबर ट्रू कॉलर वर सायबर पोलीस नावाने सेव केले जातात म्हणजे कुणाला कॉल केला तर पोलिसांचा कॉल आहे असा समज होतो बनावट सायबर क्राईम पोलिस ठाणेही या गुन्हेगारांनी तयार केले आहेत. तरुणाई अशा व्हिडिओंकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याने राज्यात फसवणुकीचे अनेक प्रकार होतात. हे अश्लील कॉल उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक अशा अनेक ठिकाणाहून येतात. मात्र, त्यांचा तपास लावणे देखील लावता येत नाही. या सगळ्या प्रकरणावर पोलीस प्रशासन आता तातडीने कामाला लागलं असले तरी राज्यात या टोळीने नुसता हैदोस माजवलेला आहे. विशेष म्हणजे बदनामीच्या बोटी पोटी अनेक लोक तक्रारी सुद्धा करत नाहीत.

व्हिडीओ कॉल  रेकॉर्ड आणि ब्लँकमेलिंग

महाराष्ट्रात फसवणुकीचे असे अनेक प्रकार घडत आहेत मध्ये अनेक तरुणांसोबत अलीकडेच घटना घडली या तरुणास मुलीचा हाय.. असा मेसेज आला. कोण आहे असे विचारले, पण उत्तर दिले नाही. नंतर त्याला व्हिडिओ सेक्समध्ये स्वारस्य आहे का, असे विचारणारा मेसेज आला. त्यानंतर त्याला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला आणि महिलेने त्याला बाथरूममध्ये जाण्यास सांगितले. महिलेने फोनवर अश्लील कृत्य करत त्याला कपडे काढण्यास सांगितले. तरुणाने तसेच केले आणि महिलेने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याला कॉल येऊ लागले की त्यांनी त्याचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि त्याने पैसे न दिल्यास तो सोशल मीडियावर प्रसारित केला जाईल.

अशी घ्यावी काळजी

मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करणे आता गरजेचे झाले आहे त्यासाठी शक्यतो अनोळखी व्यक्तीशी मैत्री टाळावी. फेसबुकची फ्रेंड लिस्ट केवळ आपल्याला दिसेल अशी सेटिंग ठेवा. अनोळखी व्यक्तीशी संयमाने बोला. आपल्या कोणत्याही फ्रेंडला किंवा आपल्या खासगी आयुष्यात देखील न्यूड फोटो काढणे, व्हिडिओ कॉल करणे हे कृत्य करू नका. व्हाट्सअप वर तरुणीने व्हिडिओ कॉल चे आम्हीच दाखवले तर त्याला कधीही बळी पडू नका. आपल्याला कुणी धमकी देवून ब्लॅकमेल करीत असल्यास जवळच्या सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क करा.

वीज कंपनीच्या नावाने फेक व्हाट्सअप मेसेज

आजकाल सोशल मीडियावर अनेक गैरप्रकार सुरू आहेत. सायबर क्राईम करणारे भामटे नानाविध आयडिया लढविताना दिसतात. सध्या वीज वितरण कंपनीच्या नावाने फेक व्हाट्सअप मेसेज करून आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय झालेली असून याबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. अर्थात what is cyber crime? सायबर क्राईम काय असतो हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

अनेक ग्राहकांची फसवणूक

वीजबिल थकबाकीदारांना तत्काळ वीजबिल न भरल्यास रात्री ९ वाजता तुमच्या घरातील वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा महावितरणच्या नावाने व्हॉट्सअला मॅसेज पाठवून ग्राहकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. मॅसेजमध्ये नमूद मोबाइल क्रमांकाद्वारे थकीत वीज भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. आजपर्यंत असंख्य ग्राहकांची फसवणूक झाली आहे. मात्र, आपण लुटल्या गेलो, हे सर्वांसमोर येईल या भीतीपोटी तसेच वेळ निघून गेल्याने तक्रार देण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. बँकखाते केवायसी करायचे आहे, मोबाइल नंबर अपडेट करायाचा आहे, एटीएम कार्ड अपडेट करायचे आहे. अशा विविध प्रकारे मॅसेज किंवा मोबाइलद्वारे संपर्क करून आतापर्यंत हजारो ग्राहकांकडून लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सदर फसवणूक करणाऱ्यांनी दुसऱ्या राज्यातील कोणत्याही शहरात बसून बँक खातेदारांची फसवणूक करत लाखोंचा फटका दिल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

याबाबत काहींनी तक्रार केल्यानंतरही आरोपींना अटक करण्यास संबंधित पोलीस यंत्रणेला यश आले नाही. सदर फसवणूक करणारे कोणत्या ठिकाणाहून मोबाइल करतात, याबाबत संबंधित सायबर विभागाला माहिती मिळत नसल्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी बँकेनंतर महावितरणला लक्ष्य केले आहे. महावितरणच्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे मॅसेज पाठवत आहेत. त्यात तुम्ही मागील महिन्याचे बिल न भरल्यामुळे रात्री ९.३० वाजेनंतर विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यासाठी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे म्हटले आहे. संबंधित ग्राहकांने दिलेल्या क्रमांकावर संपर्क केल्यास ग्राहकाला वीज बिलावरील ग्राहक क्रमांक विचारण्यात येतो, त्यानंतर बिलावर असलेली रक्कम ऑनलाइन भरण्यास सांगितली जाते. मात्र, भरलेली रक्कम महावितरणला न मिळता दुसऱ्याच कोणत्यातरी खात्यात वळती होते. हा प्रकार ग्राहकांना लवकर लक्षात येत नाही. पुढील महिन्याच्या बिलात थकबाकी दाखविल्यानंतर बिल भरले नसल्याचे दिसून येत आहे. यावेळी भरलेली रक्कम कोठे गेली, याचाही शोध लागत नाही. अशा प्रकारे महावितरणच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

हॉट्सॲपला महावितरणचा लोगो

थकीत वीजबिल न भरल्यास रात्री ९.३० नंतर वीजपुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे नमूद मोबाइल क्रमांकावर संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असा मॅसेज आलेला व्हॉट्सअॅप अकाऊंटला महावितरणचा लोगो असल्यामुळे अनेक ग्राहकांचा विश्वास बसतो. त्यामुळे असंख्य ग्राहक संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क करीत असल्यामुळे थकीत वीजबिल ‘भरल्यानंतर पुढील महिन्याच्या आलेल्या बिलानंतर चौकशी केल्यास फसवणूक झाल्याचे उघडकीस येते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेल्यामुळे फसवणूक झालेले असंख्य ग्राहक तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.महावितरणतर्फे ग्राहकांना व्हीएम- एमएसईडीसीएल किंवा व्हके एमएसईडीसीएल या अधिकृत नावाने मॅसेज प्राप्त होत असतो. मात्र, अन्य मॅसेज, कॉल, व्हॉट्सअॅपद्वारे कोणत्याही प्रकारे मॅसेज पाठविण्यात येत नाहीत. तसेच ग्राहकांना मोबाइवर कोणत्याही प्रकारे संपर्क करून थकीत वीज भरण्याचे सांगण्यात येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी व्हॉट्स अॅपद्वारे आलेल्या मॅसेजमध्ये दर्शविलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करू नये, असे आवाहन करण्यात वीज कंपनीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

वीज बिलाच्या नावावर असा गंडा

ऑनलाईन व्यवहार करताना तुम्ही खबरदारी घेतली नाही तर, फसवणूक झाल्याशिवाय राहत नाही. आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. वेगवेगळे आमिष दाखवून लुबाडणूक करणारी टोळी सक्रिय आहे. अश्या फसवणुकी पासून सावधान राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केल्या जात असते. मात्र तरी सुद्धा नागरिक आवश्यक काळजी घेत नाहीत, परिणामी त्यांना आर्थिक फसवणुकीचे बळी (Cyber crime) ठरावे लागते.

अशी झाली फसवणूक

गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात डिझिटल व्यव्यहार वाढले आहेत. हे व्यवहार सोपे आणि जलद गतीने होत असतात. आजकाल लोक रोख व्यवहार सोडून डिझिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. वेबसाईट, मोबाईल अँप, वॉलेट, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, प्रीपेड कार्ड, यूपीआयसारख्या विविध पेमेंट सिस्टीम याद्वारे डिजिटल व्यवहार (Digital transactions)  केल्या जातात. अचानक अशा व्यवहारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाढत्या व्यवहारांबरोबर त्यातील धोक्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलीस ठाणे

सायबर गुन्हयाच्या (Cyber crime) घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झालेली आहे. नागरिकांनी फेक कॉलपासून सावध राहून आलेल्या कोणत्याही मोबाइल फोनची लिंक डाउनलोड करू नये, जेणेकरून नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक होणार नाही. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि तातडीने जवळील पोलिस स्टेशन किंवा अकोला सायबर पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा, असे आवाहन अकोला पोलिस दलाच्या (akola city police) वतीने करण्यात आले आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान या संबंधातील नवा कायदा तयार असून लवकरच तो अमलात येईल. सायबर संबंधित तक्रारींचे निवारण लवकरात लवकर होण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना केल्या आहेत. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने झाला पाहिजे याकरिता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे.

पुढील गोष्टी नक्की ध्यानात ठेवा!

ऑनलाईन करावेत पुरेशी काळजी घेऊन करावे. व्यवहार करणे सोपे असून त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होते. संकेतस्थळाची सुरक्षितता तपासून घ्यावी.अधिकृत संकेतस्थळावायून किंवा अँपवरून व्यवहार करावेत. थर्ड पार्टी अँप डाउनलोड करू नये. अनोळखी व्यक्तीने लिंक शेअर केली असेल तर त्यावर क्लिक करू नये. बक्षिसांचे मेल डिलीट करावे ,या जगात कोणी कोणालाही फुकट काहीही देत नाही. आपली गोपनीय माहिती जसे आधार कार्ड, पॅन, खाते क्रमांक, कार्ड नंबर, सिव्हीव्ही, लॉग इन आयडी, पासवर्ड, ओटीपी कुणालाही शेअर करू नये. शक्य असल्यास ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र डिव्हाईस वापरावा. जर असे करणे अशक्य असेल तर आपला फोन, लॅपटॉप पीसी अन्य व्यक्तीस वापरण्यास देऊ नये. क्यू आर कोडची गरज पैसे देण्यासाठी लागते, मिळवण्यासाठी नाही हे कायम लक्षात ठेवावे.आपल्या खात्यातील शिल्लक, आलेले एसएमएस, मेल ठराविक कालावधीने तापासावेत. काही त्रुटी आढळल्यास त्वरित निदर्शनास आणावी.आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो त्याच्या तक्रार निवारण पद्धती, टोल फ्री नंबर आपल्या हाताशी असावेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक संस्थेकडे त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा असते त्यांचा लाभ घ्यावा.

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावावर आर्थिक लुबाडणूक

कॉल गर्ल (call girl), एस्कॉर्ट सर्व्हिस (Escort service ) अश्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार करून सेक्स रॅकेट (Sex racket) चालविणाऱ्यांवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. तरीही चोरून लपून असे प्रकार सुरू असून काही भामट्यांनी तर यातही पुढे जात बनावट अकाऊंटद्वारे फसवणूक व आर्थिक लुबाडणूक करण्याचे पसुरू केले असल्याची माहिती आहे. अशा प्रकरणांमध्ये बदनामी पोटी बरेच जण पोलिसात तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने अनेक प्रकरणे उजेडात येत नाहीत.नागपूर पुणे आणि मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये देह व्यापार करणारे रॅकेट सक्रिय आहेत त्यांनी आता डिझिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे सुरू केले आहे. ग्राहकांना शोधण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जात आहे. आधी मुंबई आणि पुण्यामध्ये सीमित असलेले हे प्रकार आता लहान मोठ्या शहरांमध्ये सुद्धा पोहोचले आहेत एस्कॉर्ट सर्विस च्या नावाखाली हा गोरख धंदा सुरू आहे.

सोशल मीडियावर आपले नंबर व्हायरल करून ही टोळी अनेक शहरात सक्रिय आहे. व्हॉट्सअँपच्या माध्यमातून महिलांचे फोटो उच्चभ्रु ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केल्या जाते. मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात अश्या घटना घडल्या असून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नागपूर शहरात सलून आणि स्पाच्या आड सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी याआधी तर एका लॉज आणि फ्लॅट मध्ये सुध्दा नुकतीच कारवाई करण्यात आलेली आहे.दरम्यान आता कॉल गर्ल व एस्कॉर्ट सर्विसच्या नावावर फसवणूक करणारी टोळी देखील नागपूर शहरात सक्रिय झाली असल्याची माहिती आहे. सोशल मीडिया साईटवर मोबाईल नंबर देवून ग्राहकांना हेरलं जाते. त्याना सुंदर मुलींचे फोटो पाठवुन ऑनलाइन ऍडव्हान्स पैसे मागतिले जातात आणि नंतर ग्राहकाचे लोकेशन घेऊन त्याला जवळच्या एखाद्या हॉटेलचा पत्ता दिला जातो आणि पुन्हा पैशांची मागणी केली जाते मात्र गंडविले जाते. अनेकजण अशा प्रकारांना बळी पडत असून हॉटेल मालकांना मात्र अनेकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र हा सारा प्रकार म्हणजे चोरीचा मामला असल्याने तसेच बदनामीची भीती वाटत असल्याने कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page