सर्वसामन्य लोकांना परवडणारी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना

सर्वसामन्य लोकांना परवडणारी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना माहिती PMJJBY
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही गरीब लोकांसाठी महत्त्वाची विमा योजना आहे केवळ 436 रुपये भरून त्यांना 200000 (दोन लाख) रुपयांचे Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana अंतर्गत विमा संरक्षण मिळणार आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना PMJJY ही एक टर्म इन्शुरन्स योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना ही माननीय पंतप्रधान यांनी देशातील प्रत्येक गरीब नागरिकांना कमी पैशात विमा संरक्षण देण्यासाठी सन 2015 साली Pm Bima Yojana या योजनेची घोषणा केली.
pradhan mantri jeevan jyoti bima yojana mahiti in Marathi
यात सरकारी तसेच खाजगी विमा कंपांनीच्या माध्यमातून या योजनेत सभाभागी झालेल्या 18 ते 55 वर्षीच्या व्यक्तीचे कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 200000 रुपये रक्कम मिळेल.
PMJJBY Scheme ही योजना टर्म पॉलिसी असल्यामुळे ठराविक कालावधीसाठी ही विमा संरक्षण लागू राहते व सदर पॉलिसी धारकाचा या कालावधीत मृत्यू झाला तर त्याला याचा लाभ मिळणार आहे अन्यथा इतर कोणताही लाभ अथवा परतावा त्याला मिळणार नाही
योजनेचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना
योजना घोषणा दिनांक 9 मे 2015
योजनेचा उद्देश विमा रक्षण
योजनेचे लाभार्थी 18 ते 55 वर्षे चे भारतीय नागरिक
योजनेत गुंतवणूक रक्कम वार्षिक 436 रुपये
योजनेतून मिळणारा लाभ पॉलिसी धारक मयत झाल्यास 2 लाख रुपये
योजना फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा Jeevan Jyoti Bima Yojana योजनेची वैशिष्ट्ये
भारतातील नागरिकांना त्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबातील अनेकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी सरकारने त्यांच्या भविष्याचा विचार करून प्रत्येकाला पर वेळ परवडेल अशी एक विमा योजना आणली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत वार्षिक 436 रुपये विमा हप्ता भरून सहभागी होता येईल
सदर कालावधी मध्ये विमाधारक मरण पावल्यास त्याच्या वारसदारास रक्कम रुपये दोन लाख रुपये दिले जातील PMJJY योजनेचा कालावधी हा 1 जून पासून चालू होत असून तो 31 मे पर्यंत ग्राह्य धरला जातो.
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ही प्रत्येक वर्षी रिन्यू करावी लागते या योजनेमध्ये सहभागी होण्याची तारीख 1 जून ते 31 मे पर्यंत असते या योजनेत सहभागी झाल्यास पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला क्लेम करता येत नाही 45 दिवसानंतर आपल्याला क्लेम करता येतो
• PMJJY योजनेत सहभागी होण्यासाठी वयाच्या कमीत कमी 18 वर्षे ते 50 वर्षापर्यंत सहभागी होता येते।
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना अर्ज प्रक्रिया
जर आपण या केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत सहभागी होऊ इच्छिता तर आपल्याला खालील प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल
सर्वप्रथम आपण जन सुरक्षा या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला फॉर्मस हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करुन आपण पीडीएफ डाऊनलोड करू शकता
या ठिकाणी आपल्याला सर्व भाषांचा पर्याय येईल ज्या त्यानुसार आपण आपल्या भाषेतील मराठी ऑप्शन क्लिक करून मराठीमध्ये फॉर्म डाऊनलोड करू शकता
फार्ममध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी हा फॉर्म आपण आपल्या बचत खाते असलेल्या बँकेत जाऊन जमा करावा
फॉर्म जमा करतेवेळी आपण हे निश्चित करावे की आपल्या बचत खात्यामध्ये आवश्यक अशी रक्कम शिल्लक असावी
आपण बँकेत आपले फॉर्म व त्याच्यासोबत एक प्रत्येक वर्षी होणारे रक्कम संमतीपत्र देऊन जमा करावे
आपल्या खात्यातून प्रत्येक वर्षी 25 मे ते 1 जून या कालावधीत रक्कम आपल्या खात्यातून वजा होऊन आपण या योजनेत प्रत्येक वर्षी सहभागी होऊ .
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना फॉर्म PDF PMJJBY Form
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना PMJJBY Claim Form
जीवन ज्योती विमा योजना कोणत्या कारणामुळे विमा समाप्त होऊ शकतो
सदर बँक खाते बंद झाल्यामुळे
बँकेत अकाउंटवर प्रीमियम जाण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्यामुळे
वयाची 55 वर्षे पूर्ण होण्यामुळे
एक व्यक्ती एकाच कंपनीत इन्शुरन्स काढू शकतो आणि इतर ठिकाणी इन्शुरन्स काढल्यामुळे एकच ठिकाणची त्याला रक्कम मिळेल
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना पात्रता
या योजनेसाठी नागरिकाचे वर्ष हे अठरा ते पन्नास वर्ष होणे महत्त्वाचे आहे
या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला प्रतिवर्ष 436 रुपये विमा भरावा लागेल
या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा धारकाचे बँक अकाउंट असणे अनिवार्य आहे
विमाधारकास प्रत्येक प्रत्येक वर्षी 31 मे किंवा त्याच्या आधी बँकेत विमा जाण्यासाठी रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे
जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड इतर ओळखपत्र
बँक अकाउंट पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
आणि बँक अकाउंट आधार लिंक असणे महत्त्वाचे
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा क्लेम कसा करावा
योजनेचा क्लेम फक्त विमाधारक मयत झाल्यावरच करता येतो सदर योजनेच्या क्लेम मधून फक्त त्यांनी दिलेल्या वारसदारांचा हक्क राहील क्लेम करण्यासाठी विमा धारकांनी नेमलेले वारसदार पात्र आहेत सदर पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी वारसदाराने बँकेशी संपर्क करणार करावा त्यांनी बँकेतून प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा क्लेम फॉर्म भरून द्यावा सदर फॉर्म सोबत त्यांनी विमा धारक यांचे मृत्यु प्रमाणपत्र आणि कॅन्सल चेक जमा करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसंबंधी मदत कुठे मिळेल
सदर योजनेसंबंधी आपल्याला कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना टोल फ्री हेल्पलाइन नंबर दिले आहे यावर आपण आपली समस्या सांगून त्याबद्दल निराकरण करू शकता सदर हेल्पलाइनवर आपल्याला या योजनेत सहभागी होण्यासाठी तसेच क्लेम करण्यासाठी सर्व माहिती दिली जाईल हेल्पलाइन नंबर आहेत 18001801111 / 1800110001
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने बद्दल प्रश्न
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना official website कोणती ?
योजनेची अधिकृत वेबसाइट https://jansuraksha.gov.in ही आहे
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना काय आहे ?
केवळ 436 रुपया मध्ये 2 लाख रुपयाचे विमा सवरक्षन देणारी विमा योजन आहे
Pmjjby full form काय आहे
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना के अंतर्गत जीवन बीमा रक्कम किती आहे?
या योजने अंतर्गत 200000 रुपये एवढी विमा रक्कम आहे
तरी जास्तीतजास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा.
