बीडच्या माजी उपसरपंचाचा कारमध्ये मृत्यू : २१ वर्षीय नर्तिकेशी प्रेमसंबंध, ब्लॅकमेलमुळे आत्महत्या ?
सोलापूर / बीड | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय अंदाजे ३८) यांचा मृतदेह स्वतःच्या कारमध्ये डोक्याला गोळी लागलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे बीड आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे उघडकीस आली आहे. उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला असून ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३८) असं मयत उपसरपंचाचं नाव असून ते बीडमधील गेवराई येथील रहिवासी आहेत. दरम्यान, गोळी झाडून या तरुण सरपंचाने स्वतःला संपवलं की या मृत्यूला हत्येची किनार आहे? याचा तपास पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर करत आहेत. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गोळी लागून गोविंद यांनी स्वतःला संपवलं असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. पण तरीही पोलिस यंत्रणा या घटनेचा कसून तपास करत आहेत. ही हत्याही असू शकते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गेवराई तालुक्यातील दैठण येथील रहिवासी असलेले गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करायचे. त्यांचा व्यवसायात चांगला जम बसलेला असतानाच त्यांचा संपर्क पारगाव तमाशातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी आला. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि एकमेकांनी प्रेमाच्या अनाभाका घेतल्या.
दरम्यान, या काळात गोविंद बर्गे यांनी सोन्या नाण्यांसह मागील काही दिवसांपूर्वीच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील तिला घेऊन दिला होता. असं असतानाच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. याचा समेट घडवण्यासाठी गोविंद बर्गे सोलापुरातील बार्शी तालुक्यातील ससुरे येथे आपल्या कारमधून काल सोमवारी मध्यरात्री तिच्या घरी दाखल गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एका काळ्या रंगाची कार गाव परिसरात संशयास्पद परिस्थितीमध्ये असल्याचं समजल्यानं वैराग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना गोविंग बर्गे हे गाडीमध्येच मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर गाडीमध्येच एक पिस्तूल आढळून आली असून या बंदूकीनेच डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली असावी, असा प्रथम अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र घटनास्थळी काही गोष्टी पोलिसांना संशयास्पद आढळल्या असून ही हत्या आहे का? याची देखील पडताळणी ते करीत आहेत.
आत्महत्या की काहीतरी वेगळं?
१० सप्टेंबर रोजी गोविंद बर्गे हे आपल्या कारसह बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गेले.
- तिथेच त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली, असा प्राथमिक पोलिसांचा अंदाज आहे.
- घटनास्थळी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
- हा स्पष्ट आत्महत्या आहे की यामागे काही कटकारस्थान आहे, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.
🏘 गावातील वातावरण
गोविंद बर्गे हे राजकारणात सक्रिय आणि समाजात लोकप्रिय होते.
त्यांच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मात्र, एका तरुण नर्तिकेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातला आर्थिक व्यवहार, वाद आणि अखेरची आत्महत्या – या सर्व प्रकारामुळे जनतेत विविध चर्चा सुरू आहेत.
🏘 गावातील वातावरण
गोविंद बर्गे हे राजकारणात सक्रिय आणि समाजात लोकप्रिय होते.
त्यांच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मात्र, एका तरुण नर्तिकेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातला आर्थिक व्यवहार, वाद आणि अखेरची आत्महत्या – या सर्व प्रकारामुळे जनतेत विविध चर्चा सुरू आहेत.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या आत्महत्येपुरती मर्यादित नाही.
यातून दिसून येते की –
- पैसा, आकर्षण आणि चुकीच्या नात्यामुळे कसा माणूस उध्वस्त होऊ शकतो,
- तसेच ब्लॅकमेलसारख्या प्रवृत्ती किती धोकादायक ठरू शकतात.
पोलिस तपासानंतर खरी परिस्थिती स्पष्ट होईल, पण सध्या तरी या घटनेने बीड-सोलापूर जिल्हा हादरला आहे.
