तुम्हाला फक्त 20 रुपयाची सरकारी विमा योजना माहित आहे काय ?

फक्त वर्षाला 20 रुपये भरा, कुटुंबाला मिळेल अपघाती लाखोंचा फायदा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY Scheme
भारतातील प्रत्येक नागरिक त्याच्या सुरक्षिततेचा विमा काढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतो. कारण जास्त दराने विमा संरक्षण देण्यासाठी खाजगी विमा कंपन्यांकडून प्रीमियम आकारला जात असतो. हे लक्षात घेऊन, विविध प्रकारच्या सुरक्षा विमा योजना सरकारकडून कमी प्रीमियमवर चालवल्या जात आहे. या लेखाद्वारे, तुम्हाला अशाच एका योजनेशी संबंधित माहिती दिली जात आहे, या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेद्वारे अपघात झाल्यास विमा संरक्षण दिले जाईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. त्याचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील लोकंही घेऊ शकतात. केवळ प्रती वर्षाला 20 रुपये आपल्या त्यातून कटतील अपघाती लाखो रुपयांचा फायदा घेता येईल. या योजनेत कशी कराल गुंतवणूक याविषयी जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्यात सामील होऊन गरीब,शेतकरी ,कष्टकरी ,मजूर लोक देखील 2 लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकतात. देशात अनेक वर्षांपासून ही योजना सुरू असली तरी अद्यापही देशातील कोट्यवधी लोकांना सरकारी योजनेची माहिती नाही. त्यामुळे ते पात्र असूनही योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
इच्छुक लाभार्थ्यांनी प्रती वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि त्यानंतर तुम्ही २ लाखांपर्यंत अपघाती विमा पात्र ठरतात.
या योजनेशी संबंधित लोकांचे नातेवाईक. अपघाती निधन झाल्यास आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना २ लाख रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.
या प्लॅनमध्ये प्रीमियमची रक्कम लाभार्थी ऑटो डेबिट सुविधेचा वापर करूनही भरु शकतात. एका वेळी प्रति वर्ष २० रुपये जमा करू शकतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना १८ वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. लाभार्थीचे वय ७० वर्षे झाल्यावर हा विमा संपुष्टात येतो.
केंद्र सरकारने 1 जूनपासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियममध्ये वाढ केली आहे. आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये केला आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला 2 लाखांचा मृत्यू विमा देते. म्हणजेच, या अंतर्गत 2 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे, तर 1 लाख रुपये वेगवेगळ्या परिस्थितीत उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी https://jansuraksha.gov.in
