शेतकरी व उसतोड कामगार तसेच मजुरी करणारे यांच्या कुटुंब साठी व सर्व सामान्य लोकांना परवडणारा भारतीय पोस्ट बँक चा 399 चा विमा.

   शेतकरी व उसतोड कामगार तसेच मजुरी करणारे यांच्या कुटुंब साठी व सर्व सामान्य लोकांना परवडणारा भारतीय पोस्ट बँक चा 399 चा विमा.

  मी जनजागृती व आपल्या व कुटुंबाच्या हिताचे सांगत आहे एखादी घटना घडून गेल्यास विचार करण्यापेक्षा आपला व कुटुंबाचा आजच विचार करा. त्या वेळी खूप तोंडे बोलतात पण मदतीला कोन्ही येत नाही.

   मित्रांनो आपल्याला प्रत्येकालाच आपल्या स्वताच्या जीवाची,आपल्या कुटुंबाच्या जीवाची काळजी असते.

म्हणुन आपण भविष्याच्या दृष्टीकोनातुन वेगवेगळया महत्वाच्या विमा पाँलीसी खरेदी करत असतो पणहि सर्वात कमी पैसे व लाभ देणारी योजना आहे.

  आपण रोज कुठे ना कुठे आपल्या गाडीवरून प्रवास करत असतो, तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो.

आपल्या भारतामध्ये दिवसाला 100 पेक्षा जास्त व्यक्ती हे फक्त अपघात होऊन मरण पावतात. तसेच दिवसाला 5000 हजाराच्या वरती छोटे-मोठे अपघात होत असतात.

तर अशावेळी आपल्याकडे अपघात विमा असणं खूप गरजेचे आहे. कारण का? तुम्हाला माहीतच असेल अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दवाखान्यामध्ये खर्च येतो.व कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आपल्या केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिस द्वारे एक अपघात विमा बद्दल माहिती सांगणार आहे.

पोस्टामध्ये जाऊन प्रति वर्ष फक्त रुपये 399 हप्ता भरून मिळणारी रुपये दहा लाखाची पॉलिसी आहे, ज्यांनी अजून वय वर्ष 65 पूर्ण केलेले नाही, त्या सर्वांना ही पोलिसी मिळते व एकदा पॉलिसी घेतल्यानंतर 65 वर्षानंतरही ती सुरू राहते…

या पॉलीसीचे फायदे पुढील प्रमाणे आहेत

Advertisement
  1. अपघाती मृत्यू-१०लाख. सर्पदंश, विजेचा शॉक, स्वत गाडीवरून पडल्यास. पाण्यात पडून ,फर्शी वर पाय घसरून पडल्यास.
  2. अपघातामुळे कायमस्वरूपी चे अपंगत्व-१० लाख.
  3. अपघाताने अर्धांगवायू (Paralysis) झाल्यास- १० लाख रुपये.
  4. कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च 25000/- रुपये.
  5. दवाखान्याचा खर्च-६० हजार रुपये
  6. मुलाच्या शिक्षणासाठी- १ लाख प्रति मुल (जास्तीत जास्त दोन मुले)
  7.  उपचार चालू असे पर्यंत (Admit) असेपर्यंत रोज १ हजार रुपये (१० दिवस)
  8. अपघाती व तपासणी (OPD) खर्च -३० हजार रुपये

आपणही ही पॉलिसी पोस्ट बँक किंवा आपले गावचे पोस्ट कर्मचारी यांच्या कडून घ्यावी ही नम्र विनंती,

सदरील ही पॉलिसी घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे.

 कुटुंबातील एक व्यक्ती पती किंवा पत्नी हे दोघांच्या नावे पॉलिसि काढू शकतात.

 आधार कार्ड

 पॅन कार्ड

 मोबाईल नंबर

 ईमेल आयडी  (उपलब्ध असेल तर)

 रुपये 500 पोस्टाचे अकाउंट उघडण्यासाठी व पॉलिसि साठी घेऊन जाणे गरजेचे आहे,

जर पती व  पत्नीची पॉलिसि काढायची असेल तर रक्कम 1000 रुपये सोबत ठेवणे गरजेचे आहे.

 सर्व प्रक्रिया ऑनलाईन होत आहे. सदरील खाते इतर बँक प्रमाणे व्यावहार करण्यास वापरता येते.

ग्रामीण भागातील जनतेने सर्वांनी याचा लाभ घेण्यात याव.

 मित्रांनो खर पाहायला गेले तर दर महिन्याला मोबाईलचा रिचार्ज करायला,चैनचंगळ करायला, गुटख्याच्या पुडया खायला, सिगारेट ओढायला तसेच मुव्ही बघायलाच, रोज टपरीवर बसुन चहापाणी करायला, मित्रांसोबत दारू मटन पार्टी करायला आपण 1000 ते 2000 हजार असेच सहज खर्च करून टाकत असतो मग वर्षात 399 खर्च कमीच आहे.

3 thoughts on “   शेतकरी व उसतोड कामगार तसेच मजुरी करणारे यांच्या कुटुंब साठी व सर्व सामान्य लोकांना परवडणारा भारतीय पोस्ट बँक चा 399 चा विमा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page