मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबित असते याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना सौर कृषी पंप योजना यासारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनाची अंमलबजावणी करत आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे सौर ऊर्जा हा ऊर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे भारतासारख्या देशांमध्ये आठ महिने कडक ऊन असते त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर ऊर्जेचा ऊर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपाच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2022 संबंधित माहिती.
त्.त्याचप्रमाणे पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत निसर्गामध्ये अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच त्यांना अत्यंत वापर झाल्यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाला आहे शेतीसाठी पाण्याची अत्यंत महत्व आहे आणि ते मिळवण्यासाठी विजेची गरज असते ही वीज जर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातून म्हणजे सौरऊर्जेतून मिळवण्यात आली तर शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे आहेत तसेच यामुळे निसर्गाचा समतोल सुद्धा साधला जाईल वाचक मित्रांनो या लेखांमध्ये आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 विषय संपूर्ण माहिती असे या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती मिळणार त्यासाठी पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे इत्यादी आपणास आपण पाहणार आहोत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना :- ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने एक लाख सौर कृषी पंप स्थापित करण्याच्या शासनाचा उद्देश आहे या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप दुसऱ्या टप्प्यात 50000 कृषी पंप आणि तिसऱ्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरले आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक टपका प्रत्यक्ष सुरू झाल्यापासून 18 महिन्यात राबवण्यात येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे आणि यामध्ये
लाभार्थ्यांना पाच टक्के रक्कम भरवयाची आहे या योजनेअंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3,HP पंप देण्यात येतील आणि पाच एकर पेक्षा अधिक शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5HP ते 7.5 HP पंप देण्यात येतील.
