31 जुलै या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना १ रुपयात खरीप हंगामाचा पिक विमा भरता येईल

 फक्त १ रु. पीक विमा योजना महाराष्ट्र , | 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांनसाठी एक जुलैपासून पीक विम्याचे पोर्टल चालू झालेले आहेत व शेतकऱ्यांना एक जुलैपासून सीएससी सेंटर वरून किंवा इतर ठिकाणाहून पिक विमा भरता येणार आहे. खरीप हंगामाचा पिक विमा हा पिक विमा पोर्टलवर जाऊन भरता येणार आहे त्याचप्रमाणे खरीप हंगामासाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरता येईल.

शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे १ रुपया मध्ये मिळणारी पीक विमा योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे , कागदपत्रे आधार ,बँक पासबुक,पिक,पेरा ,

राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र. (१) च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. १३.१.१० अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, ईलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल. तद्नुषंगाने, मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु. १ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “एक रुपयात पीक विमा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याकरीता वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार शेतक-यांना केवळ रु.१/- भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान ३० टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही योजना खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ ते २०२५-२६  या  तीन वर्षाच्या  कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येणार आहे.

योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली.

आता आपण पाहूया एक रुपयात पीक विमा काढला जाणार ह्या बद्दल माहिती :

Advertisement

1 Rupayat Pik Vima Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली.

राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra मिळणार आहे.

याची उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली. यासाठी अंदाजे ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

1 Rupyat Pik Vima Yojana ह्या योजनेचा हेतू : राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.

पीक विमा म्हणजे काय ?

नैसर्गिक आपत्ती , कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा सरंक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

योजनेची वैशिष्ट्य : कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये :

1 Rupyat Pik Vima Yojana Maharashtra पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

या कारणांसाठी विमा कवच

– पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती अथवा किड, रोगामुळे होणारे नुकसान

– हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर, दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.

– पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, गारपीट झाल्यास नुकसान भरपाई मिळते. भारतीय कृशी विमा कंपनीतर्फे या योजनेचे संचालन केले जाते. दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे. १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

तर मग आजच CSC सेंटर वर जाऊन लवकरात लवकर विमा भरणा करावा.

धन्यवाद  !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page