रस्त्यावर वाहन चालवतांना हे करू नका –

१. मद्यपान करून गाडी चालवू नका.

२. धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.

३. कुठेही गाडी उभी करू नका.

४. गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.

वेगावर नियंत्रण, धोकादायक ओव्हरटेकिंग टाळणे, सुरक्षा नियमांची नीट अंमलबजावणी ही त्रिसूत्री राबविली तरी महामार्गावर अपघात टळू शकतात. परंतु चालक नावाच्या जमातीत ही संवेदनक्षमताच नसल्यामुळे अपघात घडतात. संवेदनक्षम चालक घडवायचे असतील तर 13 ते 35 वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींवर ते बिंबवले पाहिजे.

महामार्ग पोलिसांनी शाळा, महाविद्यालये ही लक्ष्य ठेवली पाहिजे तसेच @प्राथमिक शालेय शिक्षण, माध्यमिक शालेय  शिक्षण व पदवी शिक्षणसाठी देशभरातएकच कायदा व अभ्यासक्रमात लागू केला पाहिजे.@ यातील प्रत्येक तरुण-तरुणीला वाहतूक नियमांविषयी जागृतीकरायचे आणि त्यांना अपघातांपासून बचाव करायचा. महामार्ग पोलिसांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने फक्त कार्यक्रम न राबविता वर्षभर राज्य पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने या तरुण-तरुणींना जागृत केले पाहिजे. याचा परिणाम असा होईल की, शाळेत निघालेली मुलगी,मुलगा जेव्हा बाबांबरोबर मोटरसायकलवर बसायला लागल, तेव्हाच मुली-मुले त्यांना हेल्मेटची आठवण करून देयला लागली. कि भविष्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता कमी होईल. अपघात खरोखरच टाळायचे असतील तर याला@प्राथमिक शालेय शिक्षण, माध्यमिक शालेय  शिक्षण व पदवी शिक्षणसाठी देशभरातएकच कायदा व अभ्यासक्रमात लागू केला पाहिजे.@ या शिवाय दुसरा पर्याय नाही.

ओव्हरटेक करताना

* डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळा.

Advertisement

* काही गाडी चालक त्यांच्या गाडीचा उजवीकडील ब्लिंकर अनवधानाने सुरू ठेवतात की, जेणेकरून तुम्हाला ओव्हरटेक करणे सोपे आहे असे वाटावे; परंतु त्यावर विश्वास ठेवणे हे अपघाताला आमंत्रण असते. तुम्ही स्वत:च ओव्हरटेकबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.

* एका वेळी एकपेक्षा अधिक वाहनांना ओव्हरटेक करू नका. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लेनमध्ये पुन्हा येणे शक्य होत नाही.

* ओव्हरटेक करताना तुमच्या उजवीकडील आरशात पाहणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आणखी एक गाडी तुम्हाला ओव्हरटेक करू इच्छित असेल.

* आत्मविश्वास नसेल तर ओव्हरटेक करू नका.

* आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करू नका. अपघाताचे हे एक कारण आहे.

* पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा.

* वेग नियंत्रणात ठेवा. अधिक वेग म्हणजे गाडी तात्काळ थांबविण्यासाठी अधिक काळजी व परिश्रम आवश्यक

* अवजड वाहनांच्या मागे राहून गाडी चालवू नका. ट्रकसारख्या वाहनांना मागचे दिसत नसते. त्यामुळे तुमची गाडी मागे आहे याची त्याला माहिती होत नाही आणि त्यामुळे तो सुरक्षेची काळजी घेईल अशी अपेक्षा नसते.

* महामार्गावर गाडी चालविताना तिची तांत्रिक स्थिती दर्जेदार हवी. ब्रेक्स हे महत्त्वाचे असून कधी अचानक गाडी थांबवावी लागेल, याचा नेम नसतो.

* आपल्यावर वेगाची मर्यादा घाला.

* जी गाडी हाताळलेली नाही, त्याची नीट माहिती करून घ्या आणि मगच चालवा.

* गाडीच्या वैशिष्टय़ांविषयी माहिती करून घ्या. उदा. गाडीचा वेग वाढण्याची मर्यादा, तिची रस्ता धरून राहण्याची क्षमता, स्टिअरिंगची संवेदनक्षमता, ब्रेक्सची स्थिती आदी.

* महामार्गावर गाडी चालविताना गाण्यांचा आवाज कमी ठेवा.

* १०० टक्के एकाग्रता आणि वचनबद्धता राखूनच गाडी चालवा. झोप येत असेल तर स्टिअरिंग हातात घेऊ नका.

One thought on “रस्त्यावर वाहन चालवतांना हे करू नका –

  • April 12, 2025 at 10:25 pm
    Permalink

    I am extremely inspired along with your writing talents and also with the structure to your weblog.
    Is this a paid subject matter or did you modify it yourself?
    Either way stay up the nice high quality writing, it’s rare
    to look a great weblog like this one nowadays. HeyGen!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page