महामार्ग हे मृत्यूचे सापळे बनले
भारतात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण चिंताजनक झालेले आहे.अपघाताला प्रामुख्याने काही मानवी चुका जबाबदार आहे. अतिवेगाची नशा, हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग, मद्यपान करून गाडी चालविणे, गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे, गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान, चालकांवरील अतिताण, थकवा तसेच रस्त्यात कुठेही गाडी उभी करणे या कारणांमुळे बहुतेक अपघात होतात. त्याचबरोबर धुके किंवा मुसळधार पाऊस, प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे, जनावर रस्त्यात आडवे येणे, पादचाऱ्यांची चूक, दरड कोसळणे, वाहतुकीची कोंडी यामुळेही अपघात घडतात.अपघाताची महत्त्वाची कारणे असल्याचे लक्षात आले आहे.
या संबंधाने केलेले नियम प्रत्येक वाहन चालवणार्यांनी पाळले आणि पोलिसांनी हे नियम न पाळणार्यां प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई केली तर अपघाताचे प्रमाण बरेच खाली येण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या काळात सर्वसामान्य माणूसच बेदरकार आणि बेफिकिर व्हायला लागला आहे. शक्यतो नियम न पाळणे हे मोठे पराक्रमाचे लक्षण मानले जायला लागले आहे. त्यातल्या त्यात १३ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांचे अपघात जास्त होतात. नियम धुडकावून लावणे आणि तुफान वेगाने गाड्या चालवणे हे याच वयोगटातल्या तरुणांचे लक्षण असते.
मर्यादेपेक्षा अधिक वेळ गाडी चालवली की, पहाटेच्यावेळी ड्रायव्हरचा डोळा लागतो आणि असे अपघात होतात. खाजगी बसगाड्यांच्या ड्रायव्हरांनी किती तास गाडी चालवावी याला काही मर्यादा नाही. काही काही वेळा पूर्ण रात्रभर एकच ड्रायव्हर गाडी चालवतो. काही आमिषाने ड्रायव्हर मंडळी तुफान वेगाने गाडी चालवून अपघाताला निमंत्रण देतात. कसल्या तरी स्पर्धेच्या आहारी जाऊन स्वतःचाही जीव गमावतात आणि आपल्या सोबतच्या प्रवाशांच्याही मृत्यूस कारणीभूत ठरतात आणि समोरच्याच्या देखील मृत्यू साठी जबाबदार असतात.
वेगाने वाहने चालवताना नियमांची पायमल्ली करणे हे अटळच असते. खरे म्हणजे रात्रीची वाहतूक करताना अनेक नियम पाळले पाहिजेत असे वारंवार सांगितले जाते परंतु आपल्या देशातल्या लोकांच्या मनात सुरक्षिततेच्या उपायांच्या बाबतीत नेहमीच उपेक्षेची भावना असते. सुरक्षेचे नियम पाळण्यासाठी नसतात, ते फक्त कागदोपत्री लिहिलेले असतात असे सुशिक्षित लोक समजतात.निरक्षर हे वाहन चालवण्याच्या नियमांच्या बाबतीत अडाणीच असतात ही बेदरकारवृत्ती केवळ वाहनांच्या बाबतीतच असे नाही तर विद्युत उपकरणे वापरण्याच्या बाबतीत, बांधकामाच्या बाबतीत सुद्धा असते. मात्र वाहनांच्या बाबतीत ती जास्त प्रकर्षाने जाणवते आणि त्यांचे परिणाम जास्त गंभीर स्वरूपाचे असतात.
भारतामध्ये सातत्याने होणार्या वाहनांच्या अपघातांची जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा वेळो-वेळी दखल घेतली आहे.जगभरात होणार्या वाहन अपघातांमध्ये ९१ टक्के अपघात आपल्या देशात होतात. म्हणजे दर हजार वाहनांमागे होणार्या अपघाताचे सरासरी प्रमाण या देशात जास्त आहे. अपघात होण्याच्या कारणांमागे वाहनांचा अति वेग आणि मद्यप्राशन करून गाड्या चालवणे ही दोन मुख्य कारणे आढळतात. शहरांमध्ये वाहनांचा वेग ताशी ५० कि.मी. पेक्षा कमी असावा, असा नियम आहे. पण तो पाळला जात नाही. तो कसोशीने पाळला तर जगातले ३० टक्के अपघात कमी होतील. याचा अर्थ अती वेगाचे वेड हे अपघाताचे मुख्य कारण आहे. त्याशिवाय मद्यप्राशन करून गाड्या चालवणे हे तर एक कारण आहेच. वैशिष्ट्य म्हणजे मागासलेल्या देशांपेक्षा प्रगत देशांमध्ये दारू पिऊन गाड्या चालवण्याचे प्रमाण जास्त आहे. या संबंधात कायदा आहे, परंतु त्याचे पालन स्वत पासून केले जात नाही.
रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणारी किंवा गंभीर इजा होणारी व्यक्ती सामाजिकक्षेत्रातील महत्त्वपूर्ण असो किंवा सर्वसामान्य असो आपल्या कुटुंबासाठी,परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी ती कायमच अमूल्य असते.एकीकडे भारत स्वातंत्र्याचा 75 वा समारोह साजरा करतांना खूप दुख वाटत आहे कि लोक अजूनही अज्ञानी आहेत भारतात दररोज शेकडो नागरिक हे महामार्ग आणि द्रुतगतीमार्गांवरून (एक्स्प्रेस वे) प्रवास करताना अपघातात जखमी होतात, तर काही मृत्यूमुखीपडतात. पण जेव्हा समाजात महत्त्वपूर्ण स्थान असलेली व नसलेली प्रत्येक व्यक्ती अपघाती मृत्यूमुखीपडते तेव्हा त्या घटनेची पुढील काही दिवस जोरदार चर्चा होते आणि नंतर पुन्हापरिस्थिती ‘जैसे थे’ असते.
रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणारी किंवा गंभीर इजाहोणारी व्यक्ती सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असो किंवा सर्वसामान्य असो आपल्याकुटुंबासाठी, परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी ती कायमच अमूल्य असते. म्हणूनरस्तेअपघात देशाच्या कोणत्याही भागांत झाला आणि त्यात कोणाचाही जरी मृत्यू झाला तरतो दुःखदच आहे.
वाहनांची रचना आणि स्थिती : अनेकदा चालक आपल्या वाहनात हवे तसे बदलकरून घेतो (मॉडिफाय व्हेकल) जे पूर्णपणे अशास्त्रीय असते; त्यामुळे अपघातालानिमंत्रण मिळते. तसेच वर्षानुवर्षे वापरात असलेले जुनी, भंगार झालेली वाहने योग्यदुरुस्ती व देखभाल न करता रस्त्यावर हाकल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता असते.याशिवाय वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू पिऊन वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने प्रवासकरणे, वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करणे अशी अनेक कारणे भारतातीलरस्ते अपघातांसाठी देता येतील.समाजावर होणारे परिणामआपल्या जवळच्या व्यक्तीचा अचानक झालेला मृत्यू अत्यंत धक्कादायक व दु:खदअसतो. लेखाच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणारीव्यक्ती ही आपल्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रासाठी कायमच अमूल्य असते. त्यामुळे जेव्हाअशा प्रकारचे अपघात होतात तेव्हा त्या अपघाताचे समाजावर जे नकारात्मक परिणामहोतात त्याचे आपण सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर विश्लेषण करू शकतो.
कौटुंबिक/वैयक्तिक : ज्या व्यक्तीच्या घरात अपघाती मृत्यू होतो आणि जर ती व्यक्तीघरातील एकमेव कमवती व्यक्ती असेल तर संपूर्ण कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली येते (एकूणअपघाती मृत्यूच्या जवळपास ७० टक्के) परिणामी, घरातील महिला आणि तरुण किंवाविद्यार्थ्यांवर कुटुंब चालवण्याची जबाबदारी येते त्यामुळे कुटुंबाचा सामाजिक स्तरघसरतो. शिक्षण, रोजगार, व्यक्तिमत्त्व विकास अशा प्रमुख बाबींपासून ते कुटुंब दूरजाते. अंतत: गरिबी आणि गुन्हेगारीच्या दलदलीत कुटुंब अडकले जाते.
अपघाताची कारण : अपघाताला प्रामुख्याने काही मानवी चुका जबाबदार आहे. अतिवेगाची नशा, हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग, मद्यपान करून गाडी चालविणे, गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे, गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान, चालकांवरील अतिताण, थकवा तसेच रस्त्यात कुठेही गाडी उभी करणे या कारणांमुळे बहुतेक अपघात होतात. त्याचबरोबर धुके किंवा मुसळधार पाऊस, प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे, जनावर रस्त्यात आडवे येणे, पादचाऱ्यांची चूक, दरड कोसळणे, वाहतुकीची कोंडी यामुळेही अपघात घडतात.
अपघात टाळण्यासाठी घ्यायची दक्षता : अपघात टाळण्यासाठी नेहमी सीट बेल्ट वापरण्यात कमीपणा मानू नका, लेनची शिस्त नेहमी पाळा, आखून दिलेली वेगमर्यादा पाळा, महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा, गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा, रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा व सर्वात महत्वाचं वाहतूक नियम पाळा. तसेच मद्यपान करून गाडी चालवू नका, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका, कुठेही गाडी उभी करू नका, गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.
अपघात झाला तर काय मदत कराल :अपघात झाल्यास सर्वात आधी जखमी व्यक्तींना अपघात क्षेत्रातून बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा, त्यांचा श्वासोश्वास व हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे का हे बघा. त्याचवेळेस दुसऱ्या कोणीतरी रुग्णवाहिकेला बोलवा व तसेच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क करा. जर जखमी व्यक्तीचा श्वासोच्छवास होत नसेल/ हृदयाचे ठोके लागत नसतील तर त्याला आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास द्या व त्याची छाती हाताने दाबून पंप करा. याला सीपीआर (CARDIO PULMONARY RESUSCITATION) म्हणतात. C.P.R. चं ट्रेनिंग हॉस्पटिलमध्ये दिलं जातं. हे ट्रेनिंग सर्वांनी घ्यायला हवं. जखमी व्यक्तीचा रक्तस्राव थांबवा. जखमा झाका व फ्रॅक्चर असल्यास त्या भागाला आधार देऊन त्याची हालचाल थांबवा. आधारासाठी तुम्ही पुठ्ठा, झाडाची फांदी, पट्टी अशा कडक वस्तूंचा वापर करू शकता. जखमीस पाणी देऊ नका. कारण जर लगेचच दवाखान्यात दाखल करून शस्रक्रियेची गरज असेल तर पाणी प्यायल्याने भूल देणं धोकेदायक होऊ शकतं व त्यामुळे भूल देणं व शस्रक्रिया करणं लांबवावे लागू शकतं.
अपघाताची कारणे…
अ) मानवी चुका
१. अतिवेगाची नशा.
२. धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग.
३. मद्यपान करून गाडी चालविणे.
४. गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे.
५. गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान.
६. चालकांवरील अतिताण, थकवा.
७. कुठेही गाडी उभी करणे.
८. हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे.
ब) हवामान
१. धुके किंवा मुसळधार पाऊस
२. प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे.
क) इतर
१. जनावर रस्त्यात आडवे येणे.
२. पादचाऱ्यांची चूक.
३. दरड कोसळणे.
४. वाहतुकीची कोंडी.
ड) अंमलबजावणी
१. वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी पर्यवेक्षण न होणे तसेच मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई न होणे.
हे करा–
१. लेनची शिस्त नेहमी पाळा.
२. आखून दिलेली वेगमर्यादा पाळा.
३. महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा.
४. नेहमी सीट बेल्ट वापरा. त्यात कमीपणा मानू नका.
५. गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा.
६. रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा.
७. वाहतूक नियम पाळा.
हे करू नका –
१. मद्यपान करून गाडी चालवू नका.
२. धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.
३. कुठेही गाडी उभी करू नका.
४. गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.
वेगावर नियंत्रण, धोकादायक ओव्हरटेकिंग टाळणे, सुरक्षा नियमांची नीट अंमलबजावणी ही त्रिसूत्री राबविली तरी महामार्गावर अपघात टळू शकतात. परंतु चालक नावाच्या जमातीत ही संवेदनक्षमताच नसल्यामुळे अपघात घडतात. संवेदनक्षम चालक घडवायचे असतील तर 13 ते 35 वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींवर ते बिंबवले पाहिजे.
महामार्ग पोलिसांनी शाळा, महाविद्यालये ही लक्ष्य ठेवली पाहिजे तसेच @प्राथमिक शालेय शिक्षण, माध्यमिक शालेय शिक्षण व पदवी शिक्षणसाठी देशभरातएकच कायदा व अभ्यासक्रमात लागू केला पाहिजे.@ यातील प्रत्येक तरुण-तरुणीला वाहतूक नियमांविषयी जागृतीकरायचे आणि त्यांना अपघातांपासून बचाव करायचा. महामार्ग पोलिसांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने फक्त कार्यक्रम न राबविता वर्षभर राज्य पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने या तरुण-तरुणींना जागृत केले पाहिजे. याचा परिणाम असा होईल की, शाळेत निघालेली मुलगी,मुलगा जेव्हा बाबांबरोबर मोटरसायकलवर बसायला लागल, तेव्हाच मुली-मुले त्यांना हेल्मेटची आठवण करून देयला लागली. कि भविष्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता कमी होईल. अपघात खरोखरच टाळायचे असतील तर याला@प्राथमिक शालेय शिक्षण, माध्यमिक शालेय शिक्षण व पदवी शिक्षणसाठी देशभरातएकच कायदा व अभ्यासक्रमात लागू केला पाहिजे.@ या शिवाय दुसरा पर्याय नाही.
ओव्हरटेक करताना…
* डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळा.
* काही गाडी चालक त्यांच्या गाडीचा उजवीकडील ब्लिंकर अनवधानाने सुरू ठेवतात की, जेणेकरून तुम्हाला ओव्हरटेक करणे सोपे आहे असे वाटावे; परंतु त्यावर विश्वास ठेवणे हे अपघाताला आमंत्रण असते. तुम्ही स्वत:च ओव्हरटेकबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.
* एका वेळी एकपेक्षा अधिक वाहनांना ओव्हरटेक करू नका. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लेनमध्ये पुन्हा येणे शक्य होत नाही.
* ओव्हरटेक करताना तुमच्या उजवीकडील आरशात पाहणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आणखी एक गाडी तुम्हाला ओव्हरटेक करू इच्छित असेल.
* आत्मविश्वास नसेल तर ओव्हरटेक करू नका.
* आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करू नका. अपघाताचे हे एक कारण आहे.
* पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा.
* वेग नियंत्रणात ठेवा. अधिक वेग म्हणजे गाडी तात्काळ थांबविण्यासाठी अधिक काळजी व परिश्रम आवश्यक
* अवजड वाहनांच्या मागे राहून गाडी चालवू नका. ट्रकसारख्या वाहनांना मागचे दिसत नसते. त्यामुळे तुमची गाडी मागे आहे याची त्याला माहिती होत नाही आणि त्यामुळे तो सुरक्षेची काळजी घेईल अशी अपेक्षा नसते.
* महामार्गावर गाडी चालविताना तिची तांत्रिक स्थिती दर्जेदार हवी. ब्रेक्स हे महत्त्वाचे असून कधी अचानक गाडी थांबवावी लागेल, याचा नेम नसतो.
* आपल्यावर वेगाची मर्यादा घाला.
* जी गाडी हाताळलेली नाही, त्याची नीट माहिती करून घ्या आणि मगच चालवा.
* गाडीच्या वैशिष्टय़ांविषयी माहिती करून घ्या. उदा. गाडीचा वेग वाढण्याची मर्यादा, तिची रस्ता धरून राहण्याची क्षमता, स्टिअरिंगची संवेदनक्षमता, ब्रेक्सची स्थिती आदी.
* महामार्गावर गाडी चालविताना गाण्यांचा आवाज कमी ठेवा.
* १०० टक्के एकाग्रता आणि वचनबद्धता राखूनच गाडी चालवा. झोप येत असेल तर स्टिअरिंग हातात घेऊ नका.
देशांत अपघातांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थोडी तरी शिस्त आहे. परंतु उर्वरित राज्यात सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहिली तर फारच भयानक स्थिती असल्याचे जाणवते. ‘रस्ता अपघातमुक्त भारत’ अशी मोहीम राबविण्याची वेळ आली आहे.शेवटी काय,अपघात हा अपघात असतो. तो अपघातानेच होतो, असे म्हणण्याची प्रथा आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तरी तो ज्या गाडी चालकामुळे झाला त्याला जामीन मिळतो. मृताच्या कुटुंबीयांचे न भरून येणारे नुकसान झालेले असते. तरीही त्यास जो जबाबदार असतो तो सहिसलामत बाहेर पडलेला असतो. अशा वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मानवी चुकीमुळे झालेला अपघात याबाबतच्या कायद्यात फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळायलाच हवेत.
