शेतकरी व सर्व जनतेने लक्षात घ्या! पावसाळ्यात विधूत लाईट अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

विद्युत उपकरणांना पाऊस लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा. तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर अशा भिंती आणि विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. अशी उपकरणे खिडकीपासून दूर असावीत. जेणेकरून त्यात पाणी जाणार नाही.

  विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.

  आकाशामध्ये विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावीत. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्च दाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

  अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.

Advertisement

  विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनवधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते.

  घरातील दूरचित्रवाणीची डीश किंवा अ‍ॅंटेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे.

  टिलच्या  पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

  विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात. पायाखालची जमीन ओलसर असू नये. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

  टिलच्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावी लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

  पावसाळ्यात घरातील कोळी, कीटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीचबोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page