मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे,
मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे,
तुम्ही ज्या, ज्या ठिकाणी पैसे देऊन एखादी सेवा अथवा वस्तू विकत घेता तिथे तुमचे नाते ग्राहक आणि सेवा पुरवठादार असे तयार होते.
निकृष्ट दर्जाची व खराब सेवा देणं हे अनुचित व्यापारी प्रथेमध्ये येतं.
👉 त्यामुळे तुमची तक्रार ग्राहकमंचात हक्काने तुम्ही दाखल करू शकता व तसा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो.
👉 मागील काही वर्षात फसवणूकीचे प्रकार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली फक्त काही रुपयांची होणारी फसवणूक व त्याकडे आपण वेळेअभावी केलेले दुर्लक्ष हे होय,
👉 मित्रांनो जोपर्यंत कोणी आवाज उठवत नाही, तक्रार करत नाही, तोपर्यंत फसवणूक करणारे असे कित्येकजणांना फसवत राहतात व तीच रक्कम पुढे लाखो कोरोडोंची होते.
जागरूक ग्राहक या देशाचा एक जागरूक नागरिक होऊ शकतो,
ग्राहक मंचात तक्रार करण्यासाठी केवळ नाममात्र फी आहे, खाली दिलेली फी बाबत आणि तक्रार कुठे करावी याची सविस्तर माहिती पाहावी, वाचावी, इतरांना शेअर करावी,
👉 जिल्हा ग्राहक तक्रार आयोग-
▪️ 1 लाख ते 5 लाखापर्यन्त – कोणतीही फी नाही
▪️ 5 लाख ते 10 लाखापर्यन्त – 200/- रुपये.
▪️ 10 लाख ते 20 लाखापर्यन्त – 400/- रुपये.
▪️ 20 लाख ते 50 लाखापर्यन्त – 1000/- रुपये.
▪️ 50 लाख ते 1 कोटीपर्यन्त – 2000/- रुपये.
👉 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग-
▪️ 1 कोटी ते 2 कोटीपर्यंत – 2500/- रुपये.
▪️ 2 कोटी ते 4 कोटीपर्यंत – 3000/- रुपये.
▪️ 4 कोटी ते 6 कोटीपर्यंत – 4000/- रुपये.
▪️ 6 कोटी ते 8 कोटीपर्यंत – 5000/- रुपये.
▪️ 8 कोटी ते 10 कोटीपर्यंत – 6000/- रुपये.
👉 राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग-
▪️ 10 कोटींच्यावर – 7500/- रुपये.
👉 तुम्हाला तुमची कागदपत्रे, बिले व पैसे दिलेले पुरावे जपून ठेवायचे आहेत,
ग्राहक मंचात तक्रार करताना, फसवणूक झालेली रक्कम, तक्रारीचा खर्च, मानसिक त्रासापोटीचा खर्च व्याजासह तुम्ही मागू शकता,
ग्राहक राजा जागा हो, समाजाचा धागा आहे.
मित्रांनो, सगळ्या पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
