ऊस जळीत प्रकरणी महावितरणला नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक मंच बीड यांचे आदेश

ऊस जळीत प्रकरणी महावितरणला नुकसान भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक मंच बीड यांचे आदेश


बीड मौजे उपळी तालुका वडवणी येथील शेतकरी बाबुराव सखाराम दुधाने यांच्या शेतातील लोंबकाळलेल्या तारांच्या घर्षणाने ऊस जळून झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महावितरण कंपनीला दिले आहेत. सदरील उपळी शिवारात वडिलोपार्जित शेत जमीन असून २ एप्रिल २०२२ रोजी वीज तारांच्या घर्षणाने आगीचे लोळ शेतात पडून ऊस जळून खाक झाला त्या बाबत सर्व माहिती महावितरण कंपनीला देऊनही कसलीही दखल घेतली नाही.शेतकरी यांनी महावितरण च्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲड.एस.आर कुंभार, ॲड.व्ही.सी.मिसाळ, ॲड.एन.के.सिरसट. यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ग्राहक तक्रार क्र २११/२०२२ नुसार अर्ज दाखल केला. झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयोगाने झालेले नुकसान व मानसिक ञासापोटी शेतकऱ्यास १ लक्ष रूपये भरपाई तसेच तक्रार खर्च १००० व मानसिक शारीरिक त्रास पोटी ३००० हजार रुपये तीस दिवसांत महावितरण ने शेतकऱ्यांना द्यावे, मुदतीत न दिल्यास दसादशे ८ टक्के व्याज द्यावे. असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीधर कि कुलकर्णी, सदस्या श्रीमती मेघा गरुड,सदस्या अर्पणा दिक्षित यांनी दिनांक .२४/०८/२०२३ रोजी महावितरण कंपनीला दिले आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड.एस.आर कुंभार, ॲड.व्ही.सी.मिसाळ, ॲड.एन.के.सिरसट. यांनी बाजू मांडली त्यांना सहकार्य अक्षय सिरसट यांनी केले.
ग्राहक म्हणून प्रत्येकाने जागे होणे होणे ही काळाची गरज आहे
मित्रांनो, आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना मनातून जागे करा.

Advertisement

मी या चॅनेल च्या माध्यमातून आपल्या सभोवताली रस्ता अपघात बाबत जनजागृती, कायदेशीर मार्गदर्शन, दवाखाना मदत, तसेच आरोग्य, अपघात विमा, पिक विमा, जीवन, विमा, ग्राहक तक्रार आयोग, महावितरण, शेतकरी, विद्यार्थी, युवक, कामगार विमा, उसतोड मजूर विमा, सरकारी बँक तक्रार, पोस्ट बँक तक्रार माहितीचा अधिकार कायदा मार्गदर्शन व सामाजिक काम  करून आपल्या माहीती मध्ये भर टाकेल. इतर *सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. मो.9823204875 

टीप -अपघात मदत व  हॉस्पिटल मदत साठी 24 तास संपर्क करू शकता.

वेबसाईटवर उपयुक्त माहिती आहे  www.advnksirsat.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page