Neha Shourie : 100 कोटीचा घोटाळा उघड करणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या मर्डरची Inside Story

पंजाबच्या आरोग्य विभागात नेहा शौरी औषध परवाना अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांनी मेडिकलकर, हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली होती. त्या दिवशी नेहा शौरी आपल्या भाचीला ऑफिस दाखवण्यासाठी कार्यालयात घेऊन आल्या होत्या.

Neha Shourie Murder Case : पंजाबच्या 36 वर्षीय ड्रग इन्स्पेक्टर नेहा शौरीची दिवसा-ढवळ्या कार्यालयात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.या हत्या प्रकरणाला आता साडे चार वर्ष उलटली आहेत, मात्र अद्याप तिला न्याय मिळाला नाही. पोलिसांनी या हत्याकांडात अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केले आहे, ज्यामुळे मुख्य आरोपी अटकेपासून बचावला आहे, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा एकदा नव्याने तपास करावा, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. नेहा शौरी यांनी 100 कोटीचा ड्रग्सवर कारवाई केली होती. या कारवाईमुळेच त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.नेमकी ही संपूर्ण मर्डर मिस्ट्री काय आहे, ती जाणून घेऊयात. (neha shourie murder case punjab fda officer 100 crore buprenorphine investigation)

घटनाक्रम काय?

पंजाबच्या आरोग्य विभागात नेहा शौरी औषध परवाना अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांनी मेडिकलकर, हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली होती. त्या दिवशी नेहा शौरी आपल्या भाचीला ऑफिस दाखवण्यासाठी कार्यालयात घेऊन आल्या होत्या. या दरम्यान नेहा शौरी कार्यालयात असताना आरोपीने चौकीदारला गुंगारा देत आत शिरकाव केला. यावेळी समोर नेहा शौरी दिसताच आरोपीने बॅगेतून रिव्हॉल्व्हर काढून गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान गोळीबार केल्यानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्याला नागरीकांनी पकडली होती. यावेळी अटकेच्या भितीने आरोपीने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केली होती.

Advertisement

पु्र्ववैमनस्यातून हत्या

आरोपीचे नाव बलविंदर सिंह होते. या बलविंदरचे मोरिंडा रूपनगर परिसरातील मेडिकलचे दुकान होते. या दुकानावर एफडीएने छापा टाकला होता. या छाप्यातील टीममध्ये नेहा शौरी यांचा देखील समावेश होता. त्यावेळी छाप्यात बलविंदर सिंहला अनधिकृतपणे औषध विक्री प्रकरणी अटक केली होती. त्याचसोबत आरोपीच्या मेडिकलचे परवाना देखील रद्द करण्यात आले होते. नेहा शौरीने 14 जुलै 2018 मध्ये ड्रग कंट्रोलरकडे अंतिम रिपोर्ट सोपवली होती. या रिपोर्टमध्ये खाजगी व्यसनमुक्ती केंद्रांवर बुप्रेनॉर्फिन व इतर औषधांच्या गैरवापराची माहिती देण्यात आली. तसेच तपासात असे समोर आले आहे की 2019 मध्ये पंजाबमधील 23 खाजगी व्यसनमुक्ती केंद्रांनी 100 कोटी रुपयांच्या सुमारे पाच कोटी बुप्रेनॉर्फिन गोळ्या कोणत्याही रेकॉर्डशिवाय विकल्या जात होत्या.ब्युप्रेनॉर्फिनच्या गैरवापराचे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न तत्कालीन काँग्रेस सरकारवर करण्यात आल होत. आणि या प्रकरणाच्या तपासात ईडीला सहकार्य करण्यास नकार दिला होता. ब्युप्रेनॉर्फिन खरेदी आणि वितरणाची कागदपत्रे देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता. एजन्सीची दिशाभूल करण्यासाठी अधिकारी आणि खाजगी व्यसनमुक्ती केंद्रांद्वारे अंमली पदार्थांच्या वापराच्या डेटामध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने विधानसभेतही हाहाकार माजवला होता.

कुटुंबियांचा आरोप काय?

“आम्ही कोर्टाला सांगितले होते की, हे दुहेरी हत्याकांड आहे. नेहाची हत्या आरोपी बलविंदरने केली होती आणि त्याची हत्या दुसऱ्याने केली होती. या हत्येसाठी दोन वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर केल्याचे पुराव्यावरून दिसून येते. मी पुरावेही सादर केले आहेत. पीडित आणि आरोपीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांचा आकारही वेगवेगळा असल्याचे वडिल कॅप्टन कैलाश कुमार शौरी यांनी सांगितले.

नेहाच्या कुटुंबियांनी पोलिसाच्या तपासावरही अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. स्वत:ला मारण्यासाठी, ज्याने आधीच स्वत:वर गोळी झाडली आहे तो दुसरी गोळी कशी झाडू शकतो? नेहाच्या शरीरावर आठ जखमा होत्या, चार गोळ्या आठ जखमा कशा निर्माण करू शकतात हे कोणाच्याही कल्पनेपलीकडचे आहे, असा प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला. नेहाच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा डेटाही मिटवण्यात आला. नेहाच्या मोबाईलचे सिमकार्डही गायब होते. पोलिसांनी पीडित आणि हल्लेखोराचे मोबाईल फोन कॉल डिटेल्स शेअर केले नाहीत. या प्रकरणात कोणालाच अटक झाली नाही. कोणाचेच जबाब नोंदवण्यात आले नाहीत.

नेहा शौरीच्या आई-वडिलांनी पंजाब पोलिसांवर गंभीर आरोप करत हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आज तक/इंडिया टुडेने तपास करणाऱ्या पंजाब पोलीस अधिकाऱ्याशी आणि आरोग्य मंत्री ब्रह्म मोहिंद्र यांच्याशी या प्रकरणाबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते घटनास्थळी उपलब्ध नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page